औसा, उमरगा, तुळजापुर,कळंब व भूम येथे होणार जाहीर सभा
धाराशिव – महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे धाराशिव लोकसभा मतदार संघात जनसंवाद यात्रा करणार असून या यात्रेत ते पाच ठिकाणी जाहिर सभांद्वारे जनतेस संवाद साधणार आहेत.
मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिव जिल्ह्यात आले होते,त्यावेळी शिंदेंनी ठाकरे यांच्यावर हल्लाबोल चढवत त्यांच्या मोठ्या प्रमाणात टिकास्त्र डागले होते.
यावेळी उध्दव ठाकरे हे स्वतः धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून ते मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टिकेला काय प्रत्युत्तर देणार ह्याची उत्सुकता ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांना तसेच कार्यकर्त्यांना देखील असून विरोधक ही त्यांची टिका कान लावून ऐकतील कारण शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर ठाकरेंचा हा पहिलाच धाराशिव जिल्हा होत आहे.
बंडखोरी केलेल्या आ. ज्ञानराज चौगुले व तानाजी सावंत यांच्या मतदार संघात होणार सभा
शिवसेनेत झालेल्या फुटी नंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा होणार असून ह्या दौऱ्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील आमदार ज्ञानराज चौगुले व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी बंडखोरी केली असल्याने उमरगा व परंडा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे या सभेत ते ज्ञानराज चौगुले व तानाजी सावंत यांच्या बद्दल काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले असणार हे मात्र नक्की
ठाकरेंचा जनसंवाद यात्रेचा दौरा खालील प्रमाणे
उध्दव ठाकरे साहेब हे दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी खाजगी विमानाने लातूर एअरपोर्ट येथे 12 वाजता पोहोचणार असून त्यानंतर 12.30 वाजता औसा येथे विजय मंगल कार्यालय, तुळजापूर मोड येथे सभा घेणार आहेत व त्यानंतर लामजना, किल्लारी मार्गे उमरगा असा प्रवास करणार आहेत दिनांक 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता उमरगा येथे दत्त मंदिर समोर गुंजोटी कॉर्नर येथे सभा होणार आहे यानंतर तुळजापूर येथे संध्याकाळी 7 वाजता डॉ आंबेडकर चौक , तुळजापुर येथे सभा होणार आहे त्यानंतर तुळजापुरची सभा संपल्यानंतर शिंगोली व्हीआयपी शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम राहणार आहे
त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक 17 फेब्रुवारी रोजी शिंगोली व्ही.आय.पी. गेस्ट हाऊस येथून आळणी फाटा, ढोकी मार्गे कळंबकडे प्रवास करणार असून कळंब येथील होळकर चौक येथे 11 वाजता सभा आहे व त्यानंतर कळंबहून येरमाळा, बार्शी बायपास मार्गे परंडा कडे प्रवास करणार आहेत परंडा येथे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत होणार असून ते परंडयाहून सोनारी कडे प्रवास करणार असून सोनारी येथे भैरवनाथचे दर्शन घेणार आहेत त्यानंतर अनाळा ,वालवड मार्गे भूम कडे प्रवास करणार आहेत व भूम येथे 5 वाजता ओंकार चौक नगर पालीकच्या समोर सभा आहे व सभा संपल्यानंतर भुमहून छत्रपती संभाजी नगर एअरपोर्ट कडे प्रवास करणर आहेत.