धाराशिव – तुळजापूर विधानसभेसाठी अण्णासाहेब दराडे हा सुशिक्षित तरुण निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. ह्या पार्श्वभूमीवर त्यांनी तुळजापूर तालुक्यात गाव भेटी दौऱ्यावर जोर दिला आहे. त्यांची ही रथयात्रा गावोगावी जाऊन तुळजापूर तालुक्यात काय बदल अपेक्षित आहे हे नागरिकांना चित्ररथाच्या माध्यमातून दाखवून देत आहेत. तसेच प्रस्थापित सत्यादारांनी तुळजापूरचा पाहिजे तेवढा विकास न केल्याने तुळजापूर आज सर्व बाबींमध्ये मागासलेला तालुका राहिल्याचे दराडे हे मतदारांनी आता बदल करून आपल्याला आशीर्वाद देऊन तालुक्याचा विकास करून घ्यावा असे आवाहन दराडे यांच्याकडून करण्यात येत आहे. आण्णासाहेब दराडे यांनी काढलेली चित्ररथ यात्रा रविवारी चिकुंद्रा येथे मुक्कामी होती. सोमवारी सकाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत आण्णासाहेब दराडे यांनी सर्वांशी संवाद साधला. तलाठी कार्यालयात होत असलेली पिळवणूक, आरोग्य सुविधेचा अभाव, तसेच शेतरस्त्याच्या अडचणी अश्या विविध प्रश्नावर भाष्य करत आतापर्यंत चुकुंद्रा ग्रामस्थांनी अणदूर च्या आण्णांना साथ दिलीत, आता हगलूर च्या आण्णाला आशीर्वाद द्या! असे भावनिक आवाहन केले. तसेच उजनी धरणातून आणलेल्या पाण्याने मारुतीला अभिषेक करण्यात आला. यावेळी नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या चित्ररथ यात्रेतील सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केशर जाधवर यांच्याकडून करण्यात आली होती.