धाराशिव – धाराशिव शहरांमध्ये वाहतुकीचे तीन तेरा वाजले असून मुख्य चौकात सिग्नल बंद पडल्याने वाहतूक सेवा विस्कळीत होत आहे. अशावेळी ट्राफिक पोलीस त्या ठिकाणी गैर हजर असल्याने वाहनधारकांकडून शिस्तीचे पालन न होता वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे मात्र शहरात अनेक ठिकाणी ट्रॅफिक पोलीसांकडून वाहनधारकांची खुलेआम लूट होताना दिसून येत आहे.

दुचाकी वाहन धारकांना खुले आम डिजिटल पद्धतीने लुटण्याचा प्रकार सध्या धाराशिव शहरात सुरू आहे. नंबर प्लेट किंवा लायसन चे कारण दाखवत ही लूट तर होतेच आहे मात्र, दुचाकीस्वाराला न हटकता पुढे गेल्या नंतर त्याच्या दुचाकीच्या नंबर प्लेट चा दुचाकीस्वाराच्या न कळत गुपचूप फोटो घेऊन 1000 ते 500 रुपयांचा रक्कम वसूल केली जात असल्याचा प्रकार सद्या शहरात राजरोसपणे सुरू आहे. तर हायवे वर देखील विना हेल्मेट चे 1000 रुपये प्रमाणे ऑनलाईन दंड लावले जात आहेत. त्यामुळे हेल्मेट सक्ती नसताना देखील दंड लावले जात असल्याने वाहनधारकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे
त्यांना टार्गेट असतं हो..!
दुचाकी स्वरांना गुपचूप फाईन लावल्यानंतर दूध चाकी स्वारांकडून नाराजी व्यक्त होत असून, ट्राफिक पोलिसांना टार्गेट असेल म्हणून ते अशा प्रकारे वसुली करत असावेत अशी संतापाची प्रतिक्रिया वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे.