जिल्हा अधिकारी साहेब….रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार?
धाराशिव – जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील रस्त्यांची विकास कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आहेत. यापैकी इंदापूर ते वाशी असंच एक रस्त्याच्या विकासाचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम निकृष्टदर्जाचे होत असून,या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचं दिसून येत आहे.
रस्ता बनवल्यापासून आठ ते दहा दिवसातच सदरील रस्तावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. या रस्त्याचे काम अतिशय दर्जाहीन झाल्याचे लोकांमधून बोलले जात आहे.
शासनाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत सदरील विकास नाहीतर भकास रस्त्याची गुणवत्ता तपासणी कशी पूर्ण केली जाते ? याबाबतही बऱ्याच शंका उपस्थित केल्या जात आहेत.
त्यामुळे राज्य शासनाने सर्वसामान्यांचे हित साधत जिल्ह्यातील रस्त्याच्या कामासाठी कितीही निधी खर्च केला.
तरीही हा निधी रस्त्याच्या विकास कामाला कमी मात्र भ्रष्ट अधिकारी व निकृष्ट दर्जाचा रस्ता उभारणारा गुत्तेदार यांच्यात घशात जाणार आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी या बांधकाम विभागाची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करावी याबाबत सर्वसामान्य मधून बोलले जात आहे.
अधिकारी म्हणतात ट्रॅक्टर मुळे पडले खड्डे
याबाबत संबंधित अधिकारी मुंडे यांना संपर्क साधला असता त्यांच्याद्वारे असे सांगण्यात आले की ट्रॅक्टरला दोन-दोन ट्रॉली लावून या रस्त्यावरून वाहतूक केल्याने असे खड्डे रस्त्यावर पडले आहेत. लवकरच परत हे खड्डे बुजवण्यात येणार आहेत.