धाराशिव – ढोकी येथील त्यांना साखर कारखान्यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा पार पडला.
या मेळाव्यात राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या भाषणात खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली. गेल्या पंधरा वर्षात जिल्ह्यातील सहकार बुडवला. जिल्ह्याला मागासलेल्या जिल्ह्याच्या यादी तीन क्रमांकावर नेऊन ठेवलं अशी टीका करत त्यांनी विरोधक व सहकारी पक्षातील नेते राणा जगजीत सिंह पाटील यांच्यावर देखील नाव न घेता टीका केली.
काय म्हणाले तानाजी सावंत?
बारा तेरा वर्ष तेरणा कारखान्याची अवस्था काय होती? भैरवनाथ शुगर ने हा कारखाना चालवायला घेतला आणि परिसरातील जेवढे साखर कारखाने आहेत त्यांच्यापेक्षा जास्तीतला भाव तेरणा ने दिला. आधीच्या लोकांनी तेरणा कारखान्याचं भंगार विकलं, डीसीसी बँकेची वाट लावली, दूध संघाची अवस्था बिकट केली. तसेच खासदार ओम राजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्यावर देखील त्यांनी टीका केली. स्वतःच्या पैशात खिशातला एक पैसा देखील खर्च न करू देता त्यांना खासदार बनवलं, साधा ग्रामपंचायतचा सदस्य नसताना देखील आमदार बनवलं असे म्हणत विरोधकांवर टिका केली तर काहींनी धाराशिव शहरासाठी 154 कोटी मिळाल्याबद्दल अभिनंदनाचे बॅनर लावले पण जीआर येण्याच्या आगोदरच बॅनर लावले याचं आश्चर्य वाटलं असे म्हणत नाव न घेता तुळजापूर चे भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यावर टीका केली.