बार्शी – बार्शीतील सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि पवार भेळचे मालक विलास पवार यांनी अज्ञात कारणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
विलास पवार हे बार्शी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी होते. त्यांच्या पवार भेळ व्यवसायामुळे ते शहरात लोकप्रिय होते. मात्र, त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शुक्रवारी रात्री त्यांनी दुकानातील वरच्या मजल्यावर शालीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली, त्यांच्या चुलत्याने नियमित प्रमाणे शनिवारी दुकान उघडले असते साफ सफाई करत असताना विलास पवार हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. पोलीसांनी तात्काळ हजेरी लावून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात काही कारण समोर आलेले नाही.
या दुःखद घटनेमुळे बार्शी शहरात शोककळा पसरली असून व्यावसायिक आणि नागरिकांनी हळहळ व्यक्त केली