येरमाळा – गुन्हे शाखेचे पोलीस पथक दि. 13.03.2024 रोजी 12.30 वा. सु. रॉयल हॉटेल कळंब रोड समोर पानगाव वस्ती येथे पोलीस ठाणे येरमाळा गुरनं 12/2023 कलम 395, 506 मधील पाहीजे आरोपीस दशरथ नारायण पवार, डिगंबर नारायण पवार, सुनिता भारत चव्हाण, सारिका दशरथ पवार, रेश्मा दशरथ पवार यांना ताब्यात घेण्यासाठी गेले असता नमुद आरोपी दशरथ नारायण पवार, डिगंबर नारायण पवार, सुनिता भारत चव्हाण, सारिका दशरथ पवार, रेश्मा दशरथ पवार व इतर 10 ते 15 या सर्वांनी बेकायदेशीर जमाव जमवून मोठमोठण्याने आरडाओरड करुन रोड आडवून पोलीस पथकावर दगड फेक केली ज्यामध्ये एखाद्याचा जीव जावू शकतो हे माहित असताना देखील दगड फेक करुन पोलीस पथकातील अधिकारी व अमंलदार यांना जखमी करुन शिवीगाळ व धक्काबुक्की करुन शासकीय कामकाज करण्याकरीता अडथळा निर्माण केला. यावरुन गुन्हेशाखेचे पोलीस अंमलदार- बबन जाधवर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 308, 353, 224, 225, 294, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 सह राष्ट्रीय महामार्ग कायदा कलम 8(ब) सह 135 मपोका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.