धाराशिव – लोकसभा जसजशी जवळ येईल तसतशी नवी राजकीय समीकरणे देखील समोर येत आहेत. ठाकरेंचे निष्ठावान खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या विरुध्द लढण्यासाठी शिंदेगटाने वेगळी खेळली असुन ओमराजेंसमोर तगडा उमेदवार शिंदेगटाने हेरला आहे
आगामी लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर विरुध्द डॉ.तानाजी सावंत अशी लढत पहायला मिळण्याची शक्यता आहे
धाराशिव लोकसभा लढविण्यासाठी ईच्छुक असणारे जिल्हा परिषद धाराशिवचे माजी उपाध्यक्ष तथा आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांची अडचण वाढताना दिसतेय,धाराशिव लोकसभेसाठी धनंजय सावंत ऐवजी तानाजी सावंत लढणार असतील तर विचार करु असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय असं सांगण्यात येतंय.तसेच एका टीव्ही चॅनल च्या कार्यक्रमात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने देखील तानाजी सावंत खासदारकी लढवून निवडूण येतील व केंद्रात उद्योग मंत्री देखील होतील असे सांगितले आहे.
मात्र आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नकार दिल्याचे समजतंय,जर तानाजी सावंत नसतील तर माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांना शिंदेगटाकडुन उमेदवारी मिळु शकते. या संदर्भात चर्चा करण्यासाठी धाराशिव जिल्हयातील शिंदेगटातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक उदया मुंबईत आयोजित केली. या बैठकीसाठी जिल्हयातील पदाधिकारी आज रात्री मुंबईकडे रवाना झाले आहेत.
धनंजय सावंतचे पुनर्वसन?
जर लोकसभेसाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना उमेदवारी मिळाली तर भूम-परांडा-वाशी विधानसभेसाठी धनंजय सावंत यांचा विचार होवु शकतो
धनंजय सावंत हे परंडा तालुक्यातून दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडुन गेले आहेत.त्यांचा तालुक्यात दांडगा संपर्क असल्यामुळे कार्यकर्त्यांची फळी तयार झाली आहे. तसेच जिल्हयातील राजकारण धनंजय सावंत पाहत असल्यामुळे मोठा जनसंपर्क देखील आहे.
भाजपाच्या आ.राणाजगजितसिंह पाटील व बसवराज पाटील यांची आदला बदली?
लोकसभा लढविण्यास ईच्छुक असणारे भाजपाचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील विधानसभा निवडणुकीत आपल्या पारंपरिक मतदारसंघ धाराशिव-कळंब मतदारसंघातुन उध्दव ठाकरे गटाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या विरुध्द विधानसभेची निवडणुक लढवू शकतात
धाराशिव-कळंब मतदारसंघात त्यांचा दांडगा जनसंपर्क असल्यामुळे विधानसभेची निवडणुक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना सोपी जावु शकते
बसवराज पाटीलांसाठी नव्याने मतदार संघ?
आमदार राणाजगजितसिंह पाटील हे धाराशिव-कळंब मतदारसंघातुन निवडणूकीस थांबल्या नंतर तुळजापुर विधानसभेसाठी काँग्रेस मधुन नव्याने प्रवेश केलेले माजी मंत्री बसवराज पाटील यांना उमेदवारी मिळु शकते. काँग्रेसकडे या मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे माजी मंत्री जेष्ठ नेते मधुकर चव्हाण यांच्या विरुध्द बसवराज पाटील यांची लढत होवू शकते. तुळजापुर मतदारसंघातील लिंगायत समाजाचे मतदान आणि भाजपाचे मतदार याचा फायदा बसवराज पाटील यांना होऊ शकतो.
लोकसभा निवडणुक जस जसी जवळ येत आहेत तस तसे राजकारणातील घडामोडी पहायला भेटत आहेत. मराठी मध्ये म्हण आहे. राजकारणातील पात्र आणि नाटकातील पात्र याचा भरोसा नसतो असे चित्र येत्या लोकसभा निवडणुकीत पहायला मिळण्याची शक्यता आहे.