धाराशिव – २४३ भूम परंडा वाशी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूम तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेबांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधला.
भूम तालुक्यातील वालवड सर्कल मधील वाल्हा , चुंबळी, गोगलगाव, कासारी, वारे वडगाव, चिंचोली, रामेश्वर, उलूप, बऱ्हाणपूर, कृष्णपूर, वरुड, गोरमाळा, बुरुडवाडी येथे नागरीकांशी साधला संवाद.
यावेळी सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली उळूप येथे बऱ्हाणपूर येथील उबाठा गटाचे युवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.

आजपर्यंत भूम परंडा वाशी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत आलेलो आहे. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम म्हणून तिन्ही तालुक्यात विविध विकासकामे मार्गी लागली आहेत तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. याच विकासकामांच्या जोरावर भागातील नागरिकांनी धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेबांना पुन्हा एकदा निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे, जिल्हा समन्वयक गौतम लटके सर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अर्चनाताई दराडे, उपजिल्हाप्रमुख दत्ता बापू मोहिते, शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी गुंजाळ, निलेश शेळवणे, श्री.दत्ता काळे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख पांडुरंग धस, प्रमोद शेळके आदीसह महिला व पुरुष, युवा कार्यकर्ते यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.