• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, March 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

तेर जिल्हा परिषद गटात सक्षणा सलगर यांचा प्रचाराचा धडाका

MH25News by MH25News
February 1, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
तेर जिल्हा परिषद गटात सक्षणा सलगर यांचा प्रचाराचा धडाका
0
SHARES
176
VIEWS

धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत तेर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या उमेदवार सक्षणा सलगर यांनी प्रचाराचा जोरदार धडाका उडवून दिला आहे. गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर, घराघरांत पोहोचत सक्षणा सलगर यांनी थेट जनतेशी संवाद साधत प्रचारात आघाडी घेतली असून, त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

प्रचारात वेग, तर जनतेत उत्साह

सक्षणा सलगर यांनी प्रचाराची सुरुवात केल्यापासून तेर गटातील वातावरण पूर्णपणे बदलले आहे. छोट्या सभा, पदयात्रा, घरभेटी, महिला संवाद बैठकांच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी थेट नाळ जोडली आहे. “सत्ता नाही, सेवा” या भूमिकेतून प्रचार करत असल्याचे त्यांनी ठासून सांगितले असून, सामान्य नागरिक, महिला, युवक आणि शेतकरी वर्गात त्यांच्या प्रचाराची विशेष चर्चा आहे.

राष्ट्रवादी (शरद पवार) गटाची ताकद मैदानात

Follow us on social media:

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची उमेदवारी मिळाल्यानंतर सक्षणा सलगर यांच्या प्रचाराला अधिक बळ मिळाले आहे. शरद पवार यांच्या विचारधारेवर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता वर्ग सक्रियपणे मैदानात उतरला असून, संघटित आणि नियोजनबद्ध प्रचार ही त्यांच्या मोहिमेची जमेची बाजू ठरत आहे. विकास, महिलांचे प्रश्न आणि स्थानिक मुद्द्यांवर भर प्रचारादरम्यान सक्षणा सलगर यांनी पाणीटंचाई, रस्ते व मूलभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगार आरोग्य व शिक्षण या मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडली आहे. “तेर गटाचा विकास हा घोषणांमध्ये नाही, तर कामातून दिसला पाहिजे,” असा स्पष्ट संदेश त्यांनी जनतेला दिला आहे.

महिलांचा वाढता पाठिंबा ठरत आहे निर्णायक?

तेर गटात महिलांचा वाढता पाठिंबा सक्षणा सलगर यांच्यासाठी निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. महिला मतदारांशी थेट संवाद, त्यांच्या समस्या ऐकून घेण्याची पद्धत आणि संवेदनशील नेतृत्वशैली यामुळे सक्षणा सलगर यांची प्रतिमा “घरातील एक व्यक्ती” अशी तयार होत आहे.
तेर गटात निवडणूक रंगात सक्षणा सलगर यांच्या प्रचारामुळे तेर जिल्हा परिषद गटातील निवडणूक अधिकच रंगतदार बनली आहे. विरोधकांची धावपळ वाढली असून, राष्ट्रवादी (शरद पवार गट) या गटाला तेरमध्ये मजबूत लढत देणारी ताकद म्हणून पाहिले जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सक्षणा सलगर यांचा हा प्रचाराचा झंझावात मतपेटीत किती प्रभाव टाकतो, याकडे आता संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!