धाराशिव – रोहित दादा पवार यांनी मागील काही महिन्यांपासून शेतकरी, विद्यार्थी, युवक, महिला भगिनी यांच्या विविध प्रश्नावर या सरकारला धारेवर धरले आहे तसेच या निष्क्रिय सरकार विरुद्ध पुणे ते नागपुर 800 किमी पायी युवा संघर्ष यात्रा काढून हे सरकार निष्क्रिय आहे हे संपुर्ण महाराष्ट्राला दाखवुन दिले आहे त्यामूळे आज धाराशिव (उस्मानाबाद) राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी तर्फे आ. रोहीत दादा पवार यांच्यावर सूडबुद्धीने E. D.ची नोटीस पाठवली आहे त्याचा निषेध म्हणुन आंदोलन करण्यात आले त्यावेळी धाराशिव (उस्मानाबाद) राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष रणवीर इंगळे, तालुका उपाध्यक्ष जयंत देशमुख, युवक तालुका अध्यक्ष अमर गुंड , युवक जिल्हा सरचिटणीस गणेश एडके, तालुका सरचिटणीस सुरज वडवले , पंकज भोसले, सर्फराज कुरेशी, हेमंत भोरे,कुणाल कर्णवर , अजिंक्य हिबारे, मुस्तफा शेख, अभिजीत काळे,पंकज स्वामी, गणेश गुळमिरे, विवेक काकडे, ओंकार लाकाळ,अभय नारायणकर, महेश तिर्थकर, हरिओम राठोड,ओमकार,टेकाळे,सौरभ माने, अभिजीत डोरले, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.