धाराशिव – आपल्या मालकाचे 15 टक्के बुडाले याच तीव्र दुःख झाल्याने भाजपची मंडळी आता फडफड करु लागली आहे. तुम्ही ज्या विद्यापीठाचा उल्लेख करताय ना त्याचे संस्थापकच राणा पाटील आहेत. फक्त टक्केवारीसाठी व आपल उखळ पांढरं करण्यासाठी राणा पाटील भाजपात गेलेत. दुसऱ्या बाजूला ही दोन निष्ठावंत म्हणून देशात प्रसिद्ध आहेत. तुमच्या कुल्हेकुहीनी काही फरक पडणार नसल्याचा पलटवार ठाकरे सेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी लगावला आहे.
यावेळी गुरव म्हणाले, पहिला मुद्दा ही कामे रखडली टक्केवारीसाठी अगदी बरोबर आहे. तुमचे मालक व दुसरे माजी पालकमंत्री यांच्या भांडनात ही कामे रखडली आहेत. यामुळे आमची मागणी आहे की मुख्याधिकारी यांची नार्को टेस्ट करा म्हणजे तुमच्या विदयापीठ संस्थापकाच खरं रूप समोर येईल. ही कामे व्हावेत यासाठी सत्तेत असताना तुम्ही विरोधी मंडळीवर टक्केवारीच कारण सांगणं हास्यस्पदच नव्हे तर मूर्खपणा म्हणावा लागेल. दुसरं हे अंदाजपत्रकीय दराचे धोरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यासाठी बनविल्याचे तुम्ही सांगताय. इतके दिवस तुम्हाला या धोरणाची माहिती नसावी कदाचित कारण धाराशिव च्या कामाबाबत निर्णय हा दोन मे च्या पत्रात नमूद केला आहे. भुयारी गटार योजनेचे तुम्हाला एवढे वावडे होते तर भाजप देखील शिवसेनेबरोबर सत्तेत होती. तेव्हा त्याला विरोध करण्याची बुद्धी सुचली नाही काय? शिवाय प्रत्येक पक्षाचे त्यावेळी काढलेले जाहीरनामे तपासा आणि मग योजनेबद्दल बोलावे असा टोला सोमनाथ गुरव यांनी लगावला. शहराच्या कामाना स्थगिती देणार तुमचं सरकार, कामाना आडकाटी आणणारे तुमचेच मालक, प्रत्येक पालकमंत्री यांच्याबद्दल तक्रार करणार तुमचेच नेते. मग या तक्रारी शुद्ध भावनेने करत असतील का? की यामागेही टक्केवारीचेच कारण आहे हे जनतेला समजलं आहे. त्यामुळे आपल्या मालकांना मिळणार 15 टक्के गेलेत त्याच एवढं दुःख व्यक्त करु नका असा चिमटा सोमनाथ गुरव यांनी काढला आहे. तुमचे मालक फक्त विकास कामातच टक्केवारी घेत नाहीत तर उमेदवाराकडून देखील वसुली करतात याचा अनुभव तुमच्या पक्षाचे जिल्हा निरीक्षक असलेले आमदार यांनी त्यामुळे उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे या जिल्ह्यात टक्केवारीची सुरवात ज्या संस्थापकांनी केली ते तुमचे मालक आहेत अशीही आठवण सोमनाथ गुरव यांनी करून दिली