धाराशिव – धाराशिव नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आज उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी प्रभाग क्रमांक २(ब) येथील प्रशांत पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. पक्षाकडून त्यांना प्रभाग क्रमांक २(ब) मधून अधिकृत पुरस्कृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
प्रशांत पवार यांच्यासह अजय मोरे, चंद्रकांत महाजन, विष्णू गायकवाड, पिंटू वारे, सलीम शेख, ओमप्रकाश गोरे, जुनेद मोमीन आणि मोबीन पठाण इत्यादी कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
कार्यक्रमास प्रदेश सरचिटणीस मसूद शेख, माजी उपनगराध्यक्ष खलिफा कुरेशी,उपाध्यक्ष जयंत देशमुख,अॅड.योगेश सोन्ने पाटील, अॅड.अविनाश जाधव आणि रवि ठेंगील उपस्थित होते.











