धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांजा जिल्हा परिषद गटातून शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार प्रदीप घोणे यांनी प्रचाराला चांगलाच वेग दिला आहे. निवडणूक रणधुमाळी सुरू होताच प्रदीप घोणे यांनी सांजा गटातील गावोगावी प्रचार सुरू केला असून, बैठका, कॉर्नर सभा आणि गाठी-भेटी यावर विशेष भर दिला जात आहे.
घराघरांत थेट संवाद; प्रचाराला धार
प्रदीप घोणे हे प्रचारात थेट जनतेशी संवाद साधण्यावर भर देत आहेत. छोट्या बैठका, कोपरा सभा आणि वैयक्तिक भेटींच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी ऐकून घेत त्यावर उपायांची दिशा मांडली जात आहे. त्यामुळे प्रचारात केवळ घोषणा नव्हे, तर विश्वास आणि संवाद हा केंद्रबिंदू ठरत आहे.शिवसेना (उबाठा) विचारधारेचा प्रभावशिवसेना (उबाठा) पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता वर्ग प्रचारात सक्रिय झाला असून, संघटनात्मक ताकदीच्या जोरावर प्रचार अधिक प्रभावी होत असल्याचे चित्र आहे. पक्षाच्या भूमिकांवर आणि स्थानिक प्रश्नांवरील ठाम भूमिकेमुळे प्रदीप घोणे यांना नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
नागरिकांचा वाढता पाठिंबा
सांजा गटात प्रदीप घोणे यांच्या प्रचार दौऱ्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. युवक, महिला, शेतकरी तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने भेटत असून, “काम करणारा प्रतिनिधी हवा” अशी भावना मतदारांमध्ये व्यक्त होत आहे.स्थानिक विकास मुद्द्यांवर लक्षप्रचारादरम्यान प्रदीप घोणे यांनी रस्ते व पाणीपुरवठा,शेतीशी संबंधित प्रश्न आरोग्य व शिक्षण सुविधा ग्रामविकासाचे प्रलंबित प्रश्न या मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडली आहे. “सांजा गटाचा विकास हा केवळ कागदावर नव्हे, तर प्रत्यक्षात दिसला पाहिजे,” असा संदेश त्यांनी दिला आहे.

प्रदीप घोणे यांच्या वाढत्या प्रचारामुळे सांजा जिल्हा परिषद गटातील निवडणूक अधिकच रंगतदार होत आहे. आगामी काळात प्रचार आणखी वेग घेणार असल्याचे संकेत असून, शिवसेना (उबाठा) या गटाची भूमिका निर्णायक ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे











