वाशी – उन्हाळ्याची तीव्रता जस-जशी वाढत जाईल तस-तसा पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे. धाराशिव जिल्ह्यात अनेक भागात पाणी टंचाईचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. आणि प्रश्न गंभीर होत चालल्याने प्रशासनाद्वारे टँकर मार्फत नागरिकांना पाण्याची सोय करून देण्यात येत आहे.
वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावातील असणाऱ्या काही बोरवेल चा पाणीसाठा कमी झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी ताटकळत बसावे लागत आहे. पाणीटंचाई सुरू झाल्याने देखील ग्रामपंचायत मार्फत पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा सुरू असल्याने नागरिकांचे पाण्याविना हाल सुरू आहेत. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन प्रशासनाने दखल घेत तेरखेडकरांसाठी पाण्याची सोय करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.