बैठकीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तुळजापूर – तुळजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा आखाडा भेटला असून प्रचार बैठकांनी जोर धरला आहे. तुळजापूर नगर परिषदेची निवडणूक ही तिरंगी होणार असून तिनेही उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात प्रचाराला सुरुवात झाली आहे.
भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद पिंटू गंगणे यांनी देखील आपल्या प्रभागासह तुळजापूर शहरात प्रचार बैठकांचा धडाका सुरू केला आहे. गंगणे यांच्या रॅली, कॉर्नर सभा, बैठका, डोअर टू डोअर प्रचार सुरू असून या प्रचाराला तुळजापूर शहरातून देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी केलेली विकास कामे व यानंतर करावयाची असलेली विकास कामांचे व्हिजन घेऊन विनोद पिटू गंगणे हे मतदारांसमोर जात आहेत.

प्रचार फेऱ्या सकाळी लवकर सुरू होऊन पूर्ण दिवसभर प्रत्येक प्रभागात फिरून केलेल्या विकास कामांची यादी नागरिकांसमोर मांडताना प्रत्येक उमेदवार दिसून येत आहे. प्रचारासाठी मोजकेच काही दिवस शिल्लक असल्याने प्रचाराचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता आहे. तुळजापूर शहरात सध्यातरी विनोद पिटू गंगणे यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू करण्यात आला आहे.











