• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, July 4, 2025
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न📰 धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या📰 धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन📰 खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा📰 ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

राणा पाटील यांच्या अडवणूकीमुळं जनता वेठीस- सोमनाथ गुरव

MH25News by MH25News
May 25, 2025
in अर्थव्यवस्था, ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
राणा पाटील हेच टक्केवारीच्या विद्यापीठाचे संस्थापक – सोमनाथ गुरव नेते शिवसेना (उ.बा.ठा) यांचा घणाघात
0
SHARES
278
VIEWS

धाराशिव – एक वर्षांपासून मंजूर रस्ते फक्त राणा पाटील यांनी अडवणूक केल्यामुळे रखडले. आता जनरेट्यामुळे ही कामे होणार आहेत. त्यात राणा पाटलाचे 22 कोटी रुपये बुडाल्याने त्यांची पोटदुखी सुरु असल्याचे उद्धव ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे सिद्धार्थ बनसोडे, सरफराज काझी, राष्ट्रवादीचे बाबा मुजावर, युवासेनेचे रवी वाघमारे, राणा बनसोडे आदी उपस्थित होते.
यावेळी गुरव म्हणाले की,140 कोटीतुन शहरातील मंजूर 59 डीपी रस्ते अंदाजपत्रकीय दराने होण्याचा अडसर दूर झाला आहे. मग अश्यावेळी महाविकास आघाडीला श्रेय जाणार यामुळे राणा पाटील व त्यांचे समर्थक आता नुसत्या वावड्या उठविण्याची धडपड करत आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात याच मंडळींनी रस्त्याच्या मुद्द्यावरून खासदार व आमदार यांना दोषी ठरविण्याचा प्रयत्न केला होता. पण वास्तव लपून राहत नाही व राणा पाटील यांचा स्वभाव पाहता त्यांना कुणी चांगल केलेलं पाहवत नाही असा आहे. जनतेला वेठीस धरून यांनी शहर विकास थांबविणाऱ्या राणा पाटलाचा खरा चेहरा उघड झाला आहे. पालकमंत्री यांनी मंजूर केलेल्या जिल्हा नियोजन समितीचे अडीचशे कोटीच्या कामाला याच राणा पाटलांनी स्थगिती आणली हे जगजाहीर आहे. त्यामुळे आता राणा पाटील स्वतः चा चेहरा झाकण्यासाठी केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत असा टोला गुरव यांनी लगावला.
140 कोटीच्या कामाला 23 फेब्रुवारी 2024 रोजी प्रशासकीय मंजुरी मिळाली.. त्यानंतर सात दिवसात निविदा प्रक्रिया राबवणे बंधनकारक होते, तर 90 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते. पण एक वर्ष होऊनही निविदा उघडलीच नाही तेव्हा राणा पाटील व त्यांचे समर्थक काय करत होते असा सवाल गुरव यांनी विचारला. त्यानंतर जनतेच्या हितासाठी महाविकास आघाडीने हा विषय लावून धरला. सहा जानेवारी रोजी जनतेसह रस्ता रोको केला व तेव्हा मुख्याधिकारी यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत कामाला सुरवात करु असे लेखी आश्वासन दिले. त्यावर विश्वास ठेवून आम्ही आंदोलन स्थगित केले. 28 फेब्रुवारी नंतरही कामाच्या बाबतीत हालचाल दिसत नव्हती. पण त्या आंदोलनानंतर 25 जानेवारी रोजी निविदा दर उघडण्यात आले. तरीही कामे सुरु होत नाहीत हे पाहून 28 एप्रिल रोजी महाविकास आघाडीकडून आमरण उपोषण सुरु केले. तिसऱ्या दिवशी पालकमंत्री यांनी आंदोलनास भेट देऊन कामे करण्यात येतील असे आश्वासन दिले. पुढे दोन मे रोजीच ही कामे अंदाज पत्रकीय दराने करून घेण्याबाबत नगरपरिषद संचालनालय यांनी पालिका प्रशासनाला पत्र दिले होते. त्यानुसार 23 मे रोजी प्रधान सचिव यांच्या बैठकित हा निर्णय झाला. त्यामुळे आता गुत्तेदार हे अंदाजपत्रकीय दरानेच काम करणार असल्यामुळे शहरवासियांचे 22 कोटी रुपये वाचले आहेत. यामुळेच राणा पाटील यांची पोटदुखी सुरु असल्याचे गुरव म्हणाले.

राणा पाटील किंवा त्यांच्या समर्थक यांनी ही कामे सुरु होण्यासाठी कोणाकडे काय पाठपुरावा केला हे त्यांनी दाखवून द्यावे असे आव्हान गुरव यांनी दिले. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी संपूर्ण राज्यात जर सर्व कामे अंदाजपत्रकीय दराने करण्याचा निर्णय घेतला होता असं भाजपची मंडळी सांगत आहेत. मग राज्याच्या ऊर्जा विभागाकडून होणारी कामे अंदाजपत्रकीय दरापेक्षा अधिक कसे? असा सवाल गुरव यांनी उपस्थित केला. सत्ताधारी मंडळींनी राजकारण न करता ही कामे गुणवत्तापूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करावा आम्ही तर ते करणारच आहोत. जनहिताच्या कामात राजकारण करु नये असे आवाहन सोमनाथ गुरव यांनी यावेळी केले.

संबंधित बातम्या

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
ग्रामीण

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न

July 2, 2025
धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
क्राइम

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या

June 30, 2025
धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
अर्थव्यवस्था

धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

June 27, 2025
खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
आरोग्य

खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा

June 26, 2025
ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
क्राइम

ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले

June 16, 2025
इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा
क्राइम

इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा

June 13, 2025

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
  • धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
  • धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
  • खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
  • ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!