धाराशिव – फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड च्या वतीने 200 ते 500 कोटी या गटा मध्ये दिला जाणारा “सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार” पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ला केंद्रीय सहकार सचिव डॉ. आशिष भुतानी साहेब व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री मा.सुभाष बापू देशमुख, बुलढाणा अर्बन चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राधेश्यामजी चांडक, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मा. काकासाहेब कोयटे व फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे,नगर जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक आदरणीय पुरी साहेब, यांच्या शुभहस्ते शिर्डी येथील सहकार प्रशिक्षण केंद्रामध्ये आयोजित केलेल्या दोन दिवशीय सहकार परिषदेमध्ये देण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी सिद्दीकि मुखिम व जनरल मॅनेजर देशमुख विश्वजीत उपस्थित होते.