वाशी – वाशी तालुक्यातील वडजी येथे शेतात काम करत असताना अचानक आगी मोहोळ उठून मोहोळाच्या माशा चावल्याने एक जणांचा मृत्यू झाला. तर दोन महिला जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाशी तालुक्यातील वडजी गावात (शुक्रवारी) शेतात कामासाठी गेलेल्या लोकांना पाच वाजेच्या सुमारास आगी मोहोळ उठून त्यांच्या माशा चावल्याने दशरथ सदाशिव जाधवर, चंद्रकला दशरथ जाधवर, लता श्रीराम जाधवर, शांता चंद्रकांत मोराळे, तुळसाबाई विनायक जाधवर जखमी झाले.जखमींना तेरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करत असताना दशरथ सदाशिव जाधवर (वय 60) यांचा मृत्यू झाला.चंद्रकला दशरथ जाधवर( वय 55), शांता चंद्रकांत मोराळे या जखमी महिला व कळंब च्या जाधवर हास्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इतर दोन महिलांना प्रथमोपचार करून घरी सोडण्यात आले.
शुक्रवारी दुपारी ही आगी मोहोळ उठून मागे लागल्याचा प्रकार घडत होता. तेव्हा महिलांनी ज्वारी पिकात लपून माश्यापासून बचाव केला होता. दशरथ जाधवर हे पायाने थोडे अपंग असून ते दाजीच्या विहिरीवरची मोटर चालू करण्यासाठी गेले असता ते दुचाकीवरून मोटर चालू करत असतं. नेमक्या याचवेळी मोहोळ उठून त्यांच्या अंगावर मोहोळाच्या माशांनी हल्ला केल्याने त्यांना बचाव करता आला नाही. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.