वाशी – सोलापूर-धुळे महामार्गावर वाशी तालुक्यात पारगाव नजीक चारचाकी वाहन लुटल्याची घटना रविवारी (दि.30) रोजी घडली आहे. भास्कर बाबासाहेब मिसाळ, वय 61 वर्षे, रा. पर्णकुटी गृहनिर्माण सोसायटी व्यंकटेश पब्लीक स्कुल जवळ भक्ती कंन्टरकशन बीड ता.जि. बीड हे कुंटुबासह रविवारी (दि.30) रोजी रात्री 10 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास पारगाव शिवारातील NH 52 रोडवरुन चार चाकी गाडीतुन जात होते.
यादरम्यान अनोळखी 7 ते 8 ईसमांनी भास्कर मिसाळ यांच्या गाडीला जॅक आडवा टाकल्याने गाडीचे चेंबर फुटून ऑईल गळाल्याने मिसाळ यांनी गाडी बाजूला उभा करुन पाहत असताना अनोळखी 7 ते 8 ईसमांनी गाडीजवळ येवून मिसाळ व त्यांची पत्नी तसेच नातेवाईक यांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन त्यांच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने, दोन मोबाईल फोन, घड्याळ, रोख रक्कम 7,000 रुपये असा एकुण 4,71,650 रुपये किंमतीचा माल जबरीने काढून घेवून पसार झाले. अशा मजकुराच्या तक्रार भास्कर मिसाळ यांनी दि. 1 जुलै 2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पोलीस ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 395 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
अश्या लूटमारीच्या घटना या अगोदर देखील घडक्या असून अद्याप देखील अश्या घटना वारंवार घडत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलीस प्रशासन हातावर हात ठेवून बसल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवाश्यांतून व्यक्त होत आहे