कळंब – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रेरणेने व पालकमंत्री मा.ना.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना राज्य समन्वयक व शिवसेना धाराशिव जिल्हा निरीक्षक नितिन लांडगे यांच्या वतीने आज संत श्री रामचंद्र बोधले संस्थान डिकसळ इथून निघणा-या दिंडीतील वारक-यांना रेनकोट वितरीत करण्यात आले. यावेळी वारकरी संप्रदाय चे अध्यक्ष श्री प्रकाश महाराज बोधले यांनी उपस्थित वारकरी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी नेहमीच वारकरी व दिंडी यांना आधार दिल्याचे म्हटले. या वेळी स्त्री पुरुष वारकरी मिळून तिनशे विठूभक्तांना रेनकोट वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा, युवासेना जिल्हा प्रमुख गणेश जगताप, सरचिटणीस निखिल घोडके, सुधीर भवर, सागर मुंडे, ॲड मंदार मुळीक, शंकर वाघमारे, चेतन कात्रे, प्रेम घुले, सोमा वावरे, संजय मुंडे, सनी बोरगे, प्रशांत शेळके,शकील काझी, संघर्ष कांबळे, उत्रेश्वर बप्पा चोंदे, धम्मपाल विद्यागर, राजेश गोरे, सचीन सौलाखे, डॉ.गोविंद जोगदंड, किरण जावळे, संतोष एखंडे इत्यादी अनेक जण उपस्थित होते.