वाशी – महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, तसेच भूम परंडा वाशीचे आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. वाशी तालुका व जिल्हा स्तरावरील शिवसेना व युवासेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने मंत्री महोदयांचा विशेष सत्कार करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना उप तालुका प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती (वाशी) चे संचालक विकास तळेकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्री सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन आणि शाल-श्रीफळ देऊन अभिष्टचिंतन केले.

विकास तळेकर (शिवसेना उप तालुका प्रमुख व संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी)
बाळासाहेब मांगले (युवासेना जिल्हा प्रमुख)
अशोक लाखे माजी सरपंच लाखणगाव,
समाधान मोटे सरपंच पारगाव आदी पदाधिकारी उपस्थीत होते. सत्काराला उत्तर देताना मंत्री तानाजीराव सावंत यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. “सामान्यांतील सामान्य माणसापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे हेच आमचे ध्येय असून, कार्यकर्त्यांचे प्रेम हीच माझी खरी ऊर्जा आहे,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सावंत यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांचा गौरव केला आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना केली. या सोहळ्यामुळे वाशी तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.











