धाराशिव – धाराशिव चे माजी नगराध्यक्ष व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख मकरंद उर्फ नंदु राजेनिंबाळकर यांनी धाराशिव-कळंब मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मकरंद राजेनिंबाळकर हे नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अश्यातच आता मकरंद राजे निंबाळकर यांनी आपल्या सोशल मीडिया फेसबुक अकाऊंट वरून शिवसेना पक्षाचा उल्लेख असलेले फोटो नाव हटवल्याने चर्चा रंगू लागली आहे.

मकरंद राजेनिंबाळकर हे तुळजापूर विधानसभेसाठी इच्छुक होते मात्र त्यांना संधी न दिल्याने ते नाराज झाले होते. ह्या नाराजी मधूनच त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची देखील भेट घेतली होती.
अधिक अपडेट साठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा
त्यामुळे मकरंद राजेनिंबाळकर यांची नाराजी दूर करण्याचे आवाहन खासदार ओम राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्यासमोर असून असून हे दोन्ही नेते मकरंद राजेनिंबाळकर यांची नाराजी कश्याप्रकारे दूर करतात की मकरंद राजेनिंबाळकर आपल्या भूमिकेवर ठाम राहतात हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल