मधुकरराव चव्हाण यांची नाराजी दूर झाली नसल्याची जोरदार चर्चा; राणा जगजितसिंह पाटील यांचा विजय होणार सुकर?
तुळजापूर – तुळजापूर विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज पाटील यांच्या प्रचाराच्या शुभारंभ कार्यक्रम काल अनेक मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. काँग्रेस नेते अमित देशमुख, खा. ओम राजेनिंबाळकर तसेच जिल्ह्यातील अनेक महाविकास आघाडीचे नेते या कार्यक्रमास हजर राहिले होते. मात्र काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांनी या कार्यक्रमास पाठ फिरवल्याने मतदार संघात दिवसभर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगू लागली होती. मधुकरराव चव्हाण यांनी पाठ फिरवल्याने त्यांची नाराजी अद्याप देखील कायम असल्याचे बोलले जात आहे.
मधुकररावांनी कार्यक्रमाला पाठ फिरवल्याने काँग्रेस पक्षातील नाराजी चव्हाट्यावर आली आहे त्यामुळे काँग्रेस पक्षासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
मधुकरराव चव्हाणांसारख्या अनुभवी व जेष्ठ नेत्याला पक्षाने तिकीट नाकारल्याने चव्हाणांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. तसे त्यांनी वारंवार बोलून देखील दाखवले आहे. मधुकरराव चव्हाण यांना मानणारा मतदार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे
त्यांची नाराजी दूर नाही झाली तर महाविकास आघाडीची मोठी कोंडी होणार आहे व त्याचा फटका उमेदवार असलेल्या धीरज पाटील यांना बसू शकतो त्यामुळे राणाजगजितसिंह पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुकर होणार असल्याचे मतदासंघातून बोलले जात आहे.
अधिक अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा
त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत मधुकरराव चव्हाण यांची नाराजी दूर करण्यात महाविकास आघाडीला यश प्राप्त होते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.