लोकांची मदत करायची सोडून पहिल्या गाडीने पळाल्या; नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
काश्मीर मधील पहलगाम येथे दोन दिवसांपूर्वी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यांमध्ये 27 निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता.
या दहशतवादी हल्ल्याचा सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त होताना दिसून येत आहे. हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांचे पार्थिव काल महाराष्ट्रामध्ये आनत त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. तर एकीकडे काश्मीर मध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप आपल्या घरी परतण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. या मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे या देखील आपल्या कुटुंब तसेच मित्र परिवारासह काश्मीर मध्ये फिरण्यासाठी गेल्या होत्या. मात्र पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला आणि रुपाली पाटील या देखील भयभीत झाल्या. त्यांनी काश्मीर मधील परिस्थितीचा व्हिडिओ पब्लिश करत आपण आणि आपले कुटुंबीय व मित्रपरिवार सर्व सुरक्षित असल्याचे सांगत त्यांनी मदतीची मागणी करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोनद्वारे संपर्क साधला.
बुधवारी मध्यरात्री रुपाली ठोंबरे ह्या आपल्या कुटुंबीयांसह व मित्रपरिवारासह सुखरूप घरी दाखल झाल्या. ठोंबरे घरी दाखल झाल्याचा व्हिडिओ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी शेअर केला. ह्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
नेटकरांच्या संतप्त प्रतिक्रिया
“आम्ही पण श्रीनगर मध्येच आहोत. एकूण 57 जण आहोत. आमचा पहलगाम जाण्याचा कार्यक्रम कॅन्सल झाला आहे पण इकडे कसलाही आम्हाला त्रास झाला नाही या मॅडम उगाच पराचा कावळा करत आहेत. यांना नुसता टीआरपी हवा आहे पहलगाम येथे असणाऱ्यांचा प्रॉब्लेम झाला आहे त्यांना तात्काळ सुविधांची गरज आहे या मॅडम उगाच बोंबलत आहे”




