आयपीएलच्या 17 व्या हंगामाला आजपासून सुरवात झाली आहे. विराट कोहलीने पहिल्याच सामन्यात रेकॉर्ड केला आहे. कोहलीने केलेला रेकॉर्ड आजपर्यंत कोणालाच जमलेला नाही. याबरोबरच विराट कोहली हा बराच काळ क्रिकेटपासून लांब होता. भारताच्या संघात तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही नव्हता. पण आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात उतरल्यावर कोहलीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
याबरोबरच पहिल्या सामन्यात कोहली जेव्हा मैदानात उतरला तेव्हा त्याला जास्त चेंडू खेळायला मिळत नव्हते. कारण त्यावेळी आरसीबीचा कर्णधार फॅफ ड्यु प्लेसिस हा चेन्नईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत होता. त्यामुळे जेव्हा आरसीबी चार षटके सामना खेळला होता, तेव्हा कोहलीच्या वाट्याला फक्त चार चेंडूंच आले होते.
अशातच टी20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. तसेच विराट कोहलीला आज सामना सुरू होण्यापूर्वी टी20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा करण्यासाठी फक्त 6 धावांची गरज होती. याआधी विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि फ्रेंचायसी लीगमध्ये 11994 धावा केल्या आहेत. तर आतापर्यंत 5 फलंदाजांनी ही कामगिरी केली आहे.
दरम्यान, विराट कोहलीने आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकले आहेत. आयपीएलच्या 237 सामन्यात 7 शतकं नावावर केली आहेत. तसेच एकाच पर्वात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. 2016 मध्ये त्याने 973 धावा केल्या होत्या.