धाराशिव – स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा धनंजय मुंडे ह्या बुधवारी ( दि.21) धाराशिव दौऱ्यावर येणार आहेत.
सध्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे.तसेच पुढील काही काळात होऊ घातलेल्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य शक्ती सेनेच्या करुणा धनंजय मुंडे ह्या धाराशिव दौऱ्यावर येणार आहेत.सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राजकारणात नवीन युवक-युवतींना संधी देण्यासाठी स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा धनंजय मुंडे यांचा हा दौरा असणार आहे. यावेळी त्या प्रसार माध्यमांशी देखील संवाद साधणार आहेत.