उपनगराध्यक्षपदी शितल चोंदे यांच्या नावाची कळंब च्या जनतेतून चर्चा
कळंब – राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून त्यामुळे आता प्रत्येकालाच पालिकेची पहिली बैठक कधी होणार याची उत्सुकता लागली आहे कळंब नगरपालिकेचे कारभारी सौ. सुनंदा ताई शिवाजी कापसे ह्या निश्चित झाल्या आहेत त्यामुळे आता नूतन नगरसेवकांना पालिकेची बैठक कधी होते याकडे शहरवासीयांचे नजरा लागल्या आहेत उपनगराध्यक्षपदी शितल चोंदे यांच्या नावाची शहरवासीया मधून मागणी होत असुन चर्चेला उधाण आले आहे. नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी महायुतीच्या सौ.सुनंदा कापसे २५५४ मताने विजयी झाल्या आहेत त्याचबरोबर महायुतीचे दहा नगरसेवक ही निवडून आणण्यात यश आले आहे तर शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस यांच्या पदरात केवळ दहा नगरसेवक निवडून आणण्यात यश आले आहे मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुपडा साफ झाला आहे ही निवडणूक तिरंगी झाली होती मात्र दोन्ही राष्ट्रवादीला एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही या नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार रिंगणात होते त्यात शिवसेना-भाजप महायुतीच्या सौ. राणी उर्फ सुनंदा शिवाजी कापसे ह्या नगराध्यक्ष पदासाठी विजयी झाल्या आहेत तर उप नगराध्यक्ष पदासाठी शितल चोंदे यांच्या नावाला शहरात चांगलेच चर्चेला उधाण आले असून यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील याकडे सर्व शहरवासी यांचे लक्ष लागून राहिले आहे.











