धाराशिव – जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस पत्रकारांना वार्तांकन करण्यास प्रवेश देण्यात आला. त्याबद्दल राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचा व्हाईस ऑफ मीडियाच्यावतीने दि.८ जानेवारी रोजी सत्कार करण्यात आला.
धाराशिव जिल्हा नियोजन समितीची बैठक दि.८ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नूतन जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात घेण्यात आली. यापूर्वी पत्रकारांना या बैठकीस वार्तांकन करण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र पत्रकारांनी यासाठी वारंवार पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करून त्याचा पाठपुरावा करण्यात येत होता. त्यामुळे पालकमंत्री प्रा डॉ सावंत यांनी या वार्तांकनासाठी प्रवेश दिला. त्याबद्दल त्यांच्या संपर्क कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, व्हाईस ऑफ मीडियाचे महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे, धाराशिव तालुकाध्यक्ष अमजद सय्यद, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते, डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष वैभव पारवे, जिल्हा कार्यवाहक कुंदन शिंदे, आसिफ मुलाणी, मुस्तफा पठाण, प्रशांत कावरे, सुधीर पवार व शाहरुख सय्यद आदींसह पत्रकार उपस्थित होते.