भूम – धाराशिव लोकसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले असुन जिल्ह्यातील भूम-परांडा-वाशी विधानसभा मतदार संघामध्ये शिंदे गटाला मोठे खिंडार पडले आहे. तानाजी सावंत गटाच्या परांडा तालुका महिला आघाडी प्रमूख ताई लांडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला असुन तानाजी सावंत यांच्या गटाला मोठे भगदाड पडल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भूम येथील शासकिय विश्रामगृह या ठिकाणी ताई लांडे यांच्यासह पाचशे महिलांनी (दि.8 मार्च) प्रवेश केला आहे. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, संपर्क प्रमूख सुनिल काटमोरे, लोकसभा समन्वयक स्वप्नील कुंजीर, आमदार कैलास दादा पाटील, सहसपर्क प्रमुख शंकरराव बोरकर, मकरंद राजेनिंबाळकर, युवासेना संपर्क प्रमुख किरण लोहार, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, विधानसभा संपर्कप्रमुख संजय नटे, महिला आघाडी जिल्हा प्रमूख जिनत सय्यद, युवसेना विधानसभा प्रमूख प्रल्हाद आडागळे, उपजिल्हाप्रमूख महिला आघाडी कल्याणी बोराडे, तालुका प्रमुख ॲड श्रीनिवास जाधवर , परांडा तालुका प्रमूख मेघराज पाटील, महिला तालुका प्रमूख उमाताई रणदिवे, छाया जोगदंड, कांचन देवकर, उषा जगताप, रेखा मागळे, सोनाली साखरे, रेश्मा मेटे, उर्मिला झांबरे, रेखा गपाट यांच्यासह महिला मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करताना उपस्थित होत्या.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश झाल्याने मंत्री तानाजी सावंत यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.