धाराशिव – महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन व त्यांच्या नेतृत्वाखाली असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये पिंपळवाडी येथील शरद पवार गटाचे उपसरपंच श्री. नवनाथ जाधव, शिवसेना उ.भा.ठा.गटाचे ज्येष्ठ नेते महादेव वारे, वारकरी साहित्य परिषद तालुका अध्यक्ष ह.भ.प. अर्जुन महाराज शिंदे, शिवाजी खरेदी-विक्री संघ संचालक जयेश भडके, मुस्लिम सेल तालुका उपाध्यक्ष बादशहा शेख, वि.वि. सोसायटी व्हा. चेअरमन देवीदास गोयकर, सतीश कांबळे, नितीन तांबीले, खासापुरीचे युवराज कसबे, किशोर हावळ, लोणी ईडा गावचे विनोद थोरात यांचा समावेश आहे. यावेळी शिवसेनेचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सावंत साहेबांनी या सर्वांचे शिवसेना परिवारात स्वागत केले.

या सोहळ्यात प्रा. डॉ. तानाजीराव सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे सर, मा.नगराध्यक्ष संजय नाना गाढवे, मा. पंचायत समिती सभापती शिवाजी आण्णा भडके, तालुकाप्रमुख बालाजी गुंजाळ, गुलाब शिंदे, व युवासेना उपतालुकाप्रमुख विजय भडके यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.