धाराशिव – महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्हा युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धाराशिव स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेस भेट देऊन धाराशिव मधील गोर गरीब शेतकऱ्याना येणाऱ्या अडचणी व पिक कर्ज शेतकऱ्यांना देत असताना शासनांनी सांगितल्या प्रमाणे कोणत्याही प्रकारची सिबिलची अट न घालता शेतकऱ्यांना सरसकट पिककर्ज देण्यात यावे अन्यथा जर आपण शेतकऱ्याची अडवणुक केली तर युवासेना मार्फत मोठ्या प्रमाणात आपल्या विरोधात अंदोलन करण्यात येईल यांची आपण दक्षता घ्यावी असे आवाहनही केले
यावेळी युवासेना राज्य समन्वयक नीतीन लांडगे, युवासेना धाराशिव जिल्हा प्रमुख गणेश जगताप, युवासेना धाराशिव जिल्हा सरचिटनिस निखील घोडके, पप्पू आबा मुंडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख धाराशिव आदित्य हंबीरे, युवासेना जिल्हा समन्वयक सोशल मीडिया सोमनाथ वावरे, युवासेना तालुका प्रमुख संतोष जगदाळे, युवासेना उपतालुका प्रमुख आदित्य शिंदे, आकाश कावळे व सर्व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.