धाराशिव – सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या दुसऱ्या माळेच्या दिवशी आज ४ऑक्टोबर रोजी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यावेळी राज्यातील जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी देवीजींना साकडे घातले.
यावेळी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत,मंदिर संस्थानच्या तहसीलदार तथा व्यवस्थापक माया माने,उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख, पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.