धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे रोजगार हमी योजनेच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे
रवी राख व कृष्णा बांगर अशी हल्ला झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.भूम पंचायत समितीचे पालक तांत्रिक अधिकारी रवी राख व त्यांचा सहाय्यक कृष्णा बांगर हे दोघे काम आटोपून बोलेरो गाडीतून घराकडे निघाले होते.काही अंतर दूर गेल्यानंतर इट-आंदरूड रस्त्यावर बाईकवरून आलेल्या काही अज्ञातांनी त्यांची गाडी रोखली व काहीतरी विचारण्याच्या बहाण्याने दरवाजा उघडायला लावत दोघांना बाहेर ओढून काढत मारहाण केली.
या मारहाणीत दोघेही कर्मचारी गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी वाशी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सूरू आहे. मात्र, या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.











