• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, March 28, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

संपादक सुनील ढेपे यांचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांना “ओपन चॅलेंज”

MH25News by MH25News
August 22, 2025
in महाराष्ट्र, राजकारण, संपादकीय
0
संपादक सुनील ढेपे यांचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांना “ओपन चॅलेंज”
0
SHARES
955
VIEWS

हिंमत असेल तर संपत्तीची अदलाबदल करा, मी गोरगरिबांना वाटून टाकेन – सुनील ढेपे

विरोधातील निवेदनानंतर संपादक सुनील ढेपेंचा राणाजगजितसिंह पाटील यांना थेट इशारा

धाराशिव – धाराशिव लाईव्ह चे संपादक सुनील ढेपे हे आपल्या निर्भीड व स्पष्ट लेखणीने सर्वश्रुत आहेत. धाराशिव लाईव्ह हे जिल्ह्यातील पहिले डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करत संपादकीय क्षेत्रामध्ये पाय ठेवला. यामागे त्यांचा पत्रकारितेतील भरगच्च असा अनुभव राहिला आहे.

तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विरोधात बातम्यांचा सपाटा सुरू ठेवल्याने राणाजगजितसिंह पाटील समर्थकांनी ढेपे यांना टार्गेट करत ‘धाराशिव लाइव्ह’ न्यूज पोर्टल आणि त्याचे संपादक सुनील ढेपे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. या निवेदनाला संपादक ढेपे यांनी अत्यंत आक्रमक आणि कडक शब्दांत खास आपल्या शैलीत प्रत्युत्तर देत “माझ्यावर आरोप करण्याऐवजी हिंमत असेल तर आमदार राणाजगजितसिंह पाटलांनी माझ्याशी संपत्तीची अदलाबदल करावी, त्यांची सर्व संपत्ती मी गोरगरिबांना वाटून टाकेन,” असे दंड थोपटत थेट आव्हानच ढेपे यांनी दिले आहे.

यामध्ये आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या समर्थकांनी दिलेल्या निवेदनात ‘धाराशिव लाइव्ह’ला शासनाची परवानगी नसल्याचा दावा केला आहे. यावर ढेपे यांनी “हा घ्या पुरावा” म्हणत पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा दावा खोडून काढत “आरएनआय” चे पत्र प्रसिद्ध केले आहे.

Follow us on social media:

या निवेदनातील दुसरी मागणी संपादक सुनील ढेपे यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) तपासण्याची होती. या मागणीला केवळ सहमती न दर्शवता, ढेपे यांनी एक पाऊल पुढे टाकत, “माझे CDR जरूर तपासा, पण सोबत आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि मल्हार पाटील यांचेही CDR तपासले पाहिजेत,” अशी प्रतिमागणी केली आहे.

तिसरा आणि सर्वात गंभीर आरोप ढेपे यांच्या पुण्यातील संपत्तीच्या चौकशीची मागणी हा होता. यावर सुनील ढेपे यांनी संताप व्यक्त करत म्हटले, “माझ्या संपत्तीची जरूर चौकशी करा, पण त्याचवेळी राणाजगजितसिंह पाटील आणि त्यांच्या कार्यकर्तांच्या संपत्तीचीही निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे.”

आपल्या भूमिकेला अधिक धार देत ढेपे यांनी एक अभूतपूर्व आव्हान दिले आहे. ते म्हणाले, “माझी सगळी संपत्ती आमदार राणाजगजितसिंह पाटलांच्या नावावर करा आणि त्यांची माझ्या नावावर करा. मी ती सर्व संपत्ती इथल्या गोरगरिबांना वाटून टाकीन.”

शेवटी, पोलिसांमार्फत दबाव टाकण्याच्या या प्रकारावर बोट ठेवत ढेपे यांनी सुनावले, “चमच्यांनो, जर तुमची खरंच बदनामी झाली असेल, तर कायदेशीर मार्ग वापरा आणि कोर्टात दावा दाखल करा. प्रत्येक वेळी पोलिसांचा आधार का घेता?”

या थेट आणि आक्रमक उत्तरानंतर धाराशिवच्या राजकीय आणि पत्रकारिता वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!