सोलापूर – सोलापूरातील वैद्यकीय क्षेत्रातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील प्रसिद्ध डॉक्टराने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. शिरीष वळसंगकर हे सोलापूरमध्ये न्युरोसर्जन म्हणून प्रसिद्ध होते. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आपल्या राहत्या घरात डोक्यात गोळी झाडून जीवन यात्रा संपवली. गोळीबाराचा आवाज आल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांच्या रूमकडे धाव घेतली असता त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.उपचारासाठी त्यांना वळसंगकर रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयाबाहेर नातेवाईक तसेच मित्रमंडळाची गर्दी पहायला मिळाली. एवढ्या प्रसिद्ध डॉक्टराने टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र चर्चा रंगू लागली असून अद्याप मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. मात्र या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
डॉक्टर वळसंगकर यांचा परिचय
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी सोलापूर येथील डीबीएफ दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये शिक्षण घेतलं आणि सन्मानाने पदवी प्राप्त केली. विज्ञानाची पूर्व-पदवी सन्मानाने उत्तीर्ण झाली आणि प्री-प्रोफेशनल सन्मानाने उत्तीर्ण झाले. वैद्यकीय शिक्षण सोलापूर येथील डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केलं. त्यांनी अनुक्रमे शिवाजी विद्यापीठ आणि लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनमधून एमबीबीएस, एमडी आणि एमआरसीपी पदवी मिळवली. ते मराठी, कन्नड, इंग्रजी आणि हिंदी या चार भाषांमध्ये संवाद साधू शकत होते.
डॉक्टर वळसंगकर यांनी या ठिकाणी बजावली होती सेवा
१. अनिवार्य रोटरी इंटर्नशिप इंटर्न, सीपीआर हॉस्पिटल-कोल्हापूर (०१/०७/७८ ते ३१/१२/७८)
२. इंटर्न, प्राथमिक आरोग्य केंद्र, कुर्डुवाडी (०१/०१/७९ ते ३०/०६/७९)
३. जनरल हॉस्पिटल, सोलापूर येथे तीन वर्षांचे पदव्युत्तर प्रशिक्षण (डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेज-सोलापूर) अंतिम एमडी
४. निवासी वरिष्ठ रजिस्ट्रार (न्यूरोलॉजी विभाग) बॉम्बे हॉस्पिटल, बॉम्बे (शिक्षण न देणारे परंतु न्यूरोलॉजीमधील विशेषज्ञ प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय न्यूरोलॉजी बोर्ड, नवी दिल्ली द्वारे मान्यताप्राप्त (०७/०५/१९८३ ते २२/१२/१९८३).
५. लोकम कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट – बॉम्बे हॉस्पिटल, बॉम्बे (०८/०५/१९८३ ते २३/०५/१९८३ आणि १०/११/१९८३ ते २०/११/१९८३).