धाराशिव – धाराशिव मध्ये आज महायुतीचा जाहीर मेळावा होणार आहे.या मेळाव्यास राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत हे संबोधित करणार आहेत.तत्पूर्वी या मेळाव्यात अनेकांचे पक्षप्रवेश होतील असे पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना सांगितले होते.
भारतीय जनता पार्टी, शिवसेना (बाळासाहेब) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवाऱ गट), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), प्रहार संघटना व इतर पक्ष यांच्या जिल्हास्तरीय समन्वय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री व शिवसेनेचे नेते प्राध्यापक तानाजीराव सावंत हे हजेरी लावणार असल्यामुळे ते काय बोलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात महायुतीने सगळीकडे जिल्हास्तरावर कार्यकर्ता मेळावा घेण्याचे ठरविले आहे. राज्यस्तरावर त्यासाठी समन्वय समिती तयार करण्यात आली आहे. महायुतीमध्ये राज्यात जसे एकोप्याचे चित्र आहे. तेच चित्र गाव पातळीपर्यंत घेवून जाण्याचे काम या मेळाव्याच्या माध्यमातून केले जाणार आहे. या मेळाव्यास पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ, प्रहार संघटनेचे मयूर काकडे आदी उपस्थित राहणार आहेत.