• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, March 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

विकासाच्या मुद्द्यावर तानाजी सावंत यांना पुन्हा एकदा निवडूण देण्याचा निर्धार

MH25News by MH25News
October 13, 2024
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
विकासाच्या मुद्द्यावर तानाजी सावंत यांना पुन्हा एकदा निवडूण देण्याचा निर्धार
0
SHARES
158
VIEWS

कात्रज पुणे येथील कौटुंबिक स्नेह मेळाव्यात प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांना विकासाच्या मुद्द्यावर आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार व्यक्त

पुणे – रविवार, १३ ऑक्टोबर २०२४ रोजी पुण्यातील माऊली गार्डन मंगल कार्यालय, कात्रज येथे भूम, परांडा, वाशी येथील बांधवांचा “कौटुंबिक स्नेह मेळावा” उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली होती महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव, कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. गिरीराज सावंत यांची.

या मेळाव्यात श्री.गिरीराज सावंत यांनी मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधत भूम परांडा वाशी मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत सर्वांनी सावंत साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

आजवर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी साहेबांनी हजारो कोटींचा विकास निधी आणला आहे…सावंत साहेबांचा विकासाचा अजोड प्रवास आजही अविरत सुरू आहे. आपल्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सावंत साहेब अहोरात्र काम करत आहेत. त्यामुळे आता आपण ठरवलं पाहिजे की, ही विकासाची गंगा अशीच सतत वाहती ठेवायची असेल, तर साहेबांना पुन्हा विधानसभेत पाठवायला हवं…विकासाला साथ देण्याचं आवाहन यावेळी गिरीराज सावंत यांनी उपस्थितांना केलं.

आता ही निवडणूक फक्त एक राजकीय लढाई नाही, ही आपल्या विकासाची लढाई आहे. सावंत साहेबांनी सुरू केलेले अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत…अनेक प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत, त्या सर्वांची पोचपावती आपल्याला सावंत साहेबांना द्यायची असेल, तर साहेबांच्या नेतृत्वावर आपला विश्वास कायम ठेवून, मतदान रुपी आशीर्वाद द्यावा लागेल…

Follow us on social media:

आपण सर्वांनी एकत्र येऊन तानाजीराव सावंत साहेबांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवून आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या विकासाच्या प्रवासाला अधिक बळ द्यायचं आहे.

कार्यक्रमात दक्षिण पुणे, कात्रज परिसरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना “भूम परांडा वाशी भूषण पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. श्री. गिरीराज सावंत व मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी उपस्थित सर्वांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांच्या नेतृत्वात झालेल्या विकासकामांचे कौतुक करत, त्यांना आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक श्री.चंद्रकांत सरडे, उद्योजक श्री. राजाभाऊ शेळके, उद्योजक श्री. रामभाऊ पवार व मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी दशरथ पाटील साहेब (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन), किरण काकासाहेब घोरतळे (पत्रकार), श्री.आकाश फासगे, भाऊसाहेब कोकाटे (प्रसिद्ध निवेदक), मोहनराव तिपाले (उद्योजक), नाना पिंगळे, नदीम भाई मुजावर, एव्हरेस्ट देशमुख (युवा उद्योजक), डॉ. सुचेता भालेराव (भैरवी सोशल फाउंडेशन), श्री.रमेश गणगे, भागवत तनपुरे (कामगार नेते), अमित गायकवाड (प्रसिद्ध वकील), शहाजी गोरे (युवा उद्योजक), तात्या सरोदे (शासकीय अधिकारी), गणेश कुलकर्णी, अशोक शिंदे, चंद्रकांत कुलकर्णी, संतोष गाजरे, मारुती शिंदे (वरद एंटरप्रायझेस), डॉ.गरड, राविभाऊ बोरुडे, अतुल भराटे (Alpha Classes चा संस्थापक), तानाजी कुदळे (Swiftcon Lift’s Pvt Ltd), दत्ता भांडवलकर (युवा उद्योजक), दिलीप काळे, सुरेश काळे, सचिन शेळगावकर, जयराम रगडे, भागवत वेताळ (युवा उद्योजक) व भूम परांडा वाशी येथील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!