तरुणाने विरहाचे स्टेटस ठेवल्याने केली मारहाण; तरुणास उपचारासाठी शासकीय दवाखान्यात केले दाखल
धाराशिव – तुळजापूर तालुक्यात प्रेम प्रकरणावरून तरुणाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथील योगेश काळे या तरुणाचा गावातीलच मुली बरोबर साखर पुडा झाला होता. साखरपुडया नंतर योगेशच्या जवळच्या मित्राचे घरी ये-जा सुरू झाले. घरी सतत ये-जा सुरू झाल्याने संबंधित तरुणी व योगेश चा मित्र या दोघांमध्ये बरोबर प्रेम संबध जुळून आले.दोघांचे प्रेम एवढे वाढले की तरुणीला तिचा साखरपुडा झाला आहे याचा देखील विसर पडला.
तरुणाच्या मित्राने गुलीगत धोका देत तरुणी सोबत लग्न केले. दोघांनी केलेल्या लग्नामुळे सदरील तरुण निराश झाला. प्रेमात धोका मिळाल्याने विरह सहन न झाल्याने योगेश काळे याने डिपीवर विरहाचे स्टेटस ठेवले. याच स्टेटसचा राग मित्राला आला. ५ जुलै रोजी रात्री साडे आकरा वाजता योगेश काळेचे त्याच्या तीन मित्रांनी अपहरण करत सावरगाव येथील तलावाजवळ घेऊन जात योगेश ला अमानुष मारहाण केली. धक्कादायक म्हणजे ही अमानुष मारहाण सुरू असताना मारहाणीचे दृश्य सदरील मुलीला व्हिडिओ काँल द्वारे दाखवण्यात आले असल्याचे योगेश याने सांगितले.
जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविदयालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून मारहाण करणाऱ्या तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊन देखील आरोपींना अद्यापपर्यंत पर्यंत अटक करण्यात आली नाही.