• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, July 4, 2025
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न📰 धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या📰 धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन📰 खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा📰 ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

मुलींप्रमाणे मुलांच्याही मोफत उच्च शिक्षणासाठी कटिबद्ध – आ.राणाजगजितसिंह पाटील

MH25News by MH25News
November 2, 2024
in ग्रामीण, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, शैक्षणिक, संपादकीय
0
मुलींप्रमाणे मुलांच्याही मोफत उच्च शिक्षणासाठी कटिबद्ध – आ.राणाजगजितसिंह पाटील
0
SHARES
50
VIEWS

धाराशिव – राज्यभरातील 20 लाखाहून अधिक मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाचा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. मुलींप्रमाणेच आता गोरगरीब कुटुंबातील मुलांनाही उच्च शिक्षण मोफत मिळावे यासाठी आपण कटिबद्ध असून आपला पाठपुरावा सुरू आहे. अठराशे कोटी रूपयांचा भार उचलून मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण महायुती सरकारने सुरू केले अगदी त्याप्रमाणेच मुलांच्या मोफत उच्च शिक्षणासाठी आपण आग्रहाने प्रयत्न करीत असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

धाराशिव तालुक्यातील इर्ला, सारोळा, किणी आदी गावात दिवाळी फराळ भेटी दरम्यान आमदार पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. बारावीनंतर राज्यातील 20 लाखांपेक्षा अधिक मुलींना शासनाच्या माध्यमातून उच्च शिक्षण मोफत करण्यात आले आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण, फार्मसी यासह तब्बल 642 वेगवेगळ्या कोर्सेसचा त्यात समावेश करण्यात आला आहे. उच्च शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे, केवळ आर्थिक अडचणीमुळे राज्यातील एकही मुलगी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, त्याकरिता अठराशे कोटी रूपयांचा भार राज्य सरकार स्वतः उचलणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. अगदी याप्रमाणेच मुलांच्या शिक्षणासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे आमदार पाटील म्हणाले.

राज्यात अंदाजे पाच हजार तीनशेहून अधिक उच्च महाविद्यालये आहेत. ग्रामीण भागातील अनेक मुलांना केवळ आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे या महाविद्यालयांमधून शिक्षण घेता येत नाही. परिणामी अर्धवट शिक्षण सोडून रोजगारासाठी विस्थापित होण्याची वेळ अनेकांवर येते. शिक्षण पूर्ण नसल्यामुळे मिळणारा रोजगारही तुटपूंजा राहतो. हे दुष्टचक्र भेदण्यासाठी मुलींप्रमाणे मुलांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकारने घ्यायला हवी. परिणामी गावखेड्यातील वाड्यावस्ती तांड्यावरील होतकरू आणि हुशार मुलांचे शिक्षण अर्धवट सुटणार नाही. गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार उच्च शिक्षण मोफत उपलब्ध झाल्यानंतर ग्रामीण भागातील मुलांच्या उच्च शिक्षणाचे प्रमाणही नक्की वाढेल. त्यांच्या ठायी असलेल्या अंगभूत क्षमतांच्या जोरावर दर्जेदार उच्च शिक्षण मिळालेल्या या मुलांना रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. गोरगरीब कुटुंबातील मुलांनादेखील मोफत शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. ही बाब आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उच्च शिक्षणमंत्री यांच्या निदर्शनास यापूर्वीच आणून देत मुलांनादेखील शैक्षणिक शुल्कात शंभर टक्के सवलत देण्याची मागणीही आपण त्यांच्याकडे केली आहे.

अधिक अपडेट्ससाठी आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करा

गरजवंत मराठा मुलांसह इतर समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांनादेखील त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी मुलींप्रमाणेच मोफत उच्च शिक्षणाचा निर्णय आवश्यक आहे. हा निर्णय आपण आपल्या हक्काच्या सरकारकडून नक्की करून घेवू. मात्र त्यासाठी आपल्या सर्वांची सोबत आणि सहकार्यही अत्यावश्यक असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
ग्रामीण

कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न

July 2, 2025
धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
क्राइम

धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या

June 30, 2025
धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
अर्थव्यवस्था

धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन

June 27, 2025
खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
आरोग्य

खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा

June 26, 2025
ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
क्राइम

ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले

June 16, 2025
इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा
क्राइम

इटलकर खून प्रकरणी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला टाहो आक्रोश मोर्चा

June 13, 2025

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • कळंब मध्ये पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न
  • धाराशिव मध्ये पोटच्या नऊ वर्षीय लेकीची बापानेच केली हत्या
  • धाराशिव शहरातील विविध विकासकामांचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन
  • खाजगी रूग्णालयात जाणीवपूर्वक उपचार नाकारणार्‍या डॉक्टर व रूग्णालयाचा परवाना रद्द करावा
  • ऑनलाईन रमी गेम च्या नादातून तरुणाने कुटुंबासह जीवन संपवले
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!