धाराशिव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 10 जानेवारीचा धाराशिव दौरा रद्द झाला होता त्या पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील 13 जानेवारी रोजीचा धाराशिव दौरा रद्द करण्यात आला आहे.
पुढील काही दिवसांत अजित पवार हे धाराशिव दौऱ्यावर येतील अशी माहिती जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी दिली. अजित पवार हे धाराशिव येथे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची पदाधिकारी बैठक व मेळावा घेणार होते यासाठी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी आढावा बैठक घेऊन मेळाव्याची संपुर्ण तयारी केली होती मात्र अचानक हा दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार यांचा धाराशिव दौरा कधी जाहीर होतो याकडे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या देखील नजरा लागलेल्या आहेत.