• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, March 28, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार

MH25News by MH25News
January 9, 2026
in अर्थव्यवस्था, कृषी, क्राइम, ग्रामीण, महाराष्ट्र, संपादकीय
0
जलसंधारण विभागाच्या ४१ कोटींच्या कामांना क्लीन चिट देऊ नये; अन्यथा आंदोलनाचा छेडणार
0
SHARES
809
VIEWS

ॲड. प्रशांत जगताप यांचा धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील मृदा व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या सुमारे ४१ कोटी १२ लाख रुपये खर्चाच्या ३५ कामांबाबत गंभीर संशयास्पद बाबी समोर आल्या असून, या कामांना घाईघाईने क्लीन चिट दिल्याचे वृत्त एका वर्तमान पत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. संबंधित कामांना क्लीन चिट देण्यात येऊ नये, अशी ठाम मागणी ॲड. प्रशांत जगताप यांनी निवेदनाद्वारे धाराशिव जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. क्लीन चिट दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण व आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ॲड. जगताप यांनी माहितीच्या अधिकार कायद्या (RTI) अंतर्गत मृदा व जलसंधारण विभागाकडे संबंधित कामांची सविस्तर माहिती मागितली होती. मात्र माहिती देण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांनी टाळाटाळ करणारी, उडवाउडवीची व दिशाभूल करणारी उत्तरे दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

माहिती अधिकार अंतर्गत माहिती वेळेवर न दिल्यामुळे ॲड.प्रशांत जगताप यानी शिस्तभंगाची करवाई करण्याची मागणी देखील केली असून त्यावर देखील कोणतेही उत्तर अद्याप देखील देण्यात आलेले नाही. कामांमध्ये अनियमिततेचा संशय असून मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे कामांची गुणवत्ता, खर्चाचे अंदाजपत्रक, प्रत्यक्ष कामांची अंमलबजावणी व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले परिणाम याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही ठिकाणी कागदावरच कामे पूर्ण दाखवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पारदर्शक चौकशीची मागणी

Follow us on social media:

या प्रकरणी स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी व्हावी, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच कामांची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल जाहीर करावा, अशी मागणी ॲड. प्रशांत जगताप यांनी केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही प्रकारची क्लीन चिट देऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जर प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नाही आणि माहिती देण्याची कायदेशीर जबाबदारी पार पाडली नाही, तर धाराशिव २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासह तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा ठाम इशारा त्यांनी दिला आहे.

प्रशासनाची भूमिका काय?

या प्रकरणावर जिल्हा प्रशासन व मृदा व जलसंधारण विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. मात्र या गंभीर आरोपांमुळे जिल्ह्यातील विकासकामांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता प्रशासन काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!