तेरखेडा – धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठा आठवडी बाजार समजल्या जाणाऱ्या तेरखेडा आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. वाशी तालुक्यातील तेरखेडा गावात दर शनिवारी मोठा आठवडी बाजार भरतो. या बाजारात कळंब, भूम, वाशी, आणि बार्शी तालुक्यातील अनेक गावचे व्यापारी, नागरिक खरेदी विक्रीसाठी येत आहेत. या बाजाराचे स्वरूप मोठे असल्याने बाजारात मोठी गर्दी असते,याच गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यात दि.३० शनिवार रोजी सटवाईवाडी गावचे माजी सरपंच योगीराज फरताडे हे तेरखेडा गावात बाजार करत असतात चोरट्यांनी १३ हजार रुपये किंमत असलेला विवो कंपनीचा मोबाईल लंपास केला. गेली अनेक वर्षे झाली लाखो किंमतीचे मोबाईल चोरट्यांनी बाजारातून लंपास केले आहेत. पोलिसांच्या आशिर्वादाने हे प्रकार सुरू आहेत असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. चोरीच्या घटनांमुळे तेरखेडा आठवडी बाजारात नागरिकांमध्ये, व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांना हे प्रकार माहीत असताना देखील आठवडी बाजारात कुठलीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नाही. तेरखेडा आठवडी बाजार येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते आहे.
तेरखेडा येथे शनिवारी दुपारी दीड च्या सुमारास बाजारात भाजीपाला खरेदी केला आणि गावाकडे वापस जात असताना घरी फोन करण्यासाठी मोबाईल खिशात बघितलं तर मोबाईल नव्हता – योगीराज फरताडे – माजी सरपंच सटवाईवाडी