धाराशिव – वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे बुधवारी (दि.19) दोन गटांत तुंबळ हाणामारीची घटना घडली.
याबाबत येरमाळा पोलीस ठाण्यात परस्परांविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फिर्यादी छाया उकरंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी ऋषीकेश घुले, ऋषीकेश जाधव, अक्षय चव्हाण, स्वप्निल पौळ, कृषा कचरे, समाधान घोलप, अनिकेत पांडुरंग उकरंडे, यश माने, निखील काळे, किशोर कचरे व इतर पाच इसम सर्व रा. तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.19.03.2025 रोजी 19.30 वा. सु. तेरखेडा येथे फिर्यादी छायाबाई शिवाजी उकरंडे, वय 58 वर्षे, रा. तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव यांचा मुलगा सचिन व पुतण्या धनंजय यांनी नमुद आरोपींनी तुम्ही आमच्या घराकडे बघून शिट्ट्या व मोटरसायकलचा हॉर्न का वाजविला या कारणावरुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लाकडी दांडके, स्टील पाईप स्टिलच्या रॉड, तलवार व फायटरने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीचा मुलगा राहुल व नातु अमित हे भांडण सोडवण्यास गेले असता त्यांनाही नमुद आरोपींनी माराहण करुन गंभीर जखमी केले, जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-छायाबाई उकरंडे यांनी दि.20.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 109, 189(2), 191(1), 191(2), 190, 115(2), 352, 351(2) (3), 324(4)(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.तर ऋषिकेश घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नामे-सचिन उकरंडे, राहुल उकरंडे, अमित उकरंडे, विराज उकरंडे, आदित्य उकरंडे, धनंजय उकरंडे, अमोल उकरंडे, छायाबाई उकरंडे, नितीन उकरंडे यांनी तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.19.03.2025 रोजी 19.00 वा. सु.तेरखेडा येथे फिर्यादी नामे-ऋषीकेश बळीराम घुले, वय 21 वर्षे, रा.तेरखेडा ता.वाशी जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी घराकडे बघून शिट्ट्या व मोटरसायकलचा हॉर्न का वाजविला या कारणावरुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड व काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेला किशोर धावारे यास पण नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन मारहाण केली. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-ऋषीकेश घुले यांनी दि.20.03.2025 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 109, 189(2), 191(1), 191(2), 190, 115(2), 352, 351(2) (3) अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील अधिक तपास सुरू आहे.