26 जानेवारी रोजी रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव येथे सह्याद्री मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल व सह्याद्री ब्लड बँक धाराशिव यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर घेण्यात आले व सायली नेत्रालय धाराशिव यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. त्यादरम्यान एकुण 57 नागरिक, आयआरबी कर्मचारी व पोलीस अधिकारी/कर्मचारी यांनी रक्तदान केले
सदर कार्यक्रमांमध्ये महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव येथील पोलीस अंमलदार, IRB टोल प्लाजा येडशी येथील अधिकारी व कर्मचारी, महामार्गावर वाहतूक करणारे वाहनाचे वाहन चालक तसेच महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव परिसरातील नागरिक व मृत्युंजय दूत यांची आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी करण्यात आली. सदर वेळी लायसन्स व मोटारसायकल असणाऱ्या एकूण 110 गरजू व्यक्तींना मोफत हेल्मेट वितरित करण्यात आले. सदरील कार्यक्रमास सपोनि एन बी शिंदे प्रभारी अधिकारी महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव, विनोद जजेरिया मॅनेजर आय आर बी, गायकवाड सर टोल मॅनेजर,डॉ. संजय राऊत, दादासाहेब कोरके व स्टाफ,आय आर बी कर्मचारी अधिकारी, मृत्युंजय दूत व इतर नागरिक तसेच महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव येथील सर्व पोलिस अंमलदार उपस्थित होते.