धाराशिव – देशभरात २०२४ लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाले असताना महाराष्ट्रात तर सर्वच राजकीय पक्ष डबल-धमाल म्हणजेच लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी भूम-परांडा-वाशी विधानसभा महाविजय २०२४ संयोजक या जबाबदारीसाठी तेरखेडा (ता. वाशी) येथील प्रविण बिभीषण घुले यांची निवड केली आहे.
प्रविण बिभीषण घुले यांनी भाजयुमो धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी कार्यरत असताना अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत आणि अल्पावधीतच त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. विशेषत तरुणवर्ग प्रविण बिभीषण घुले यांच्याकडे खूप अपेक्षेने बघत आहे. अशातच प्रविण बिभीषण घुले यांच्याकडे सोपवलेल्या या महत्वाच्या जबाबदारीला ते कशाप्रकारे पार पाडतात याकडे फक्त वाशी तालुका आणि भूम-परांडा-वाशी विधानसभा मतदारसंघातील नागरीकच नाही तर संपूर्ण जिल्हा उत्सुकतेने पाहत आहे.