धाराशिव – तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडी पाठोपाठ तिसऱ्या आघाडीने तुळजापूर विधानसभेसाठी तगडा उमेदवार रिंगणात उतरवल्याने तिरंगी लढत दिसून येत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाकडून अण्णासाहेब दराडे यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. गावोगावी-खेडोपाडी तसेच तांडा व वाड्या वस्त्यांवरील तरुणांमध्ये दराडे यांची क्रेझ असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
अण्णासाहेब दराडे यांनी तालुक्यात प्रचाराचा धुरळा उडवून सोडला आहे. अण्णासाहेब दराडे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत महायुतीचे उमेदवार आमदार राणाजगजीतसिंह पाटील व महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज पाटील यांना मोठे आव्हान दिले आहे.

अण्णासाहेब दराडे हे तुळजापूर विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीचे उमेदवार असून दराडे यांच्या पाठीमागे युवराज छत्रपती संभाजीराजे, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांचे प्राबल्य पाठबळ असून या मोठ्या नेत्यांच्या पाठबळामुळे या भागात शेतकरी संघटना, स्वराज्य पक्ष व प्रहार जनशक्ती पक्ष या पक्षाचे असंख्य कार्यकर्ते असून ते कार्यकर्ते व अण्णासाहेब दराडे यांची प्रभावी प्रचार यंत्रणा यामुळे दराडे सद्या तरी प्रचारात आघाडीवर आहेत. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील जवळपास ९० टक्के मतदार संघ अण्णासाहेब दराडे यांनी आपल्या यात्रेच्या माध्यमातून पिंजून काढला आहे. अण्णासाहेब दराडे यांच्या लोप्रियतेमुळे दराडे यांची तरुणांमध्ये क्रेझ निर्माण झाली असून दराडे गावोगावी प्रचारासाठी गेल्यानंतर त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तरुण मतदार गर्दी करताना दिसून येत आहे.