• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, April 11, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 अन विकासाचं पात फिरलं…📰 सेरेंटिका रिन्यूएबल्सचा सामाजिक उपक्रम: येडेश्वरी यात्रेत भाविकांना पाणी, बिस्किटे व ओआरएसचे वाटप📰 सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

अन विकासाचं पात फिरलं…

MH25News by MH25News
April 11, 2026
in अर्थव्यवस्था, कृषी, ग्रामीण, जागतिक, तंत्रज्ञान, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
अन विकासाचं पात फिरलं…
0
SHARES
5
VIEWS

धाराशिव – समृद्ध परंपरा, कष्टाळू माणसं आणि विकासाची उर्मी असलेल्या धाराशिव जिल्ह्यात आज हरित ऊर्जेचा नवा अध्याय आकार घेत आहे. धाराशिव प्रकल्प अंतर्गत उभारल्या जाणाऱ्या पवनचक्क्या आता कार्यरत होत असून एक हरित क्रांतीचा नवा अध्याय सुरु होत आहे. या परिवर्तनाच्या प्रवासात सेरेंटिका रिन्यूएबल्स ने केवळ पवनऊर्जा प्रकल्प उभारला नाही, तर स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि शेतकरी यांना सोबत घेत विकासाचा एक मजबूत आणि विश्वासार्ह आदर्श निर्माण केला आहे.

सेरेंटिका रिन्यूएबल्स चे स्पष्ट ध्येय आहे — लोकांची सेवा करणे, समुदायांना बळकट करणे आणि राष्ट्रीय प्रगतीला हातभार लावणे. कंपनी उभारत असलेला प्रत्येक प्रकल्प हा केवळ अभियांत्रिकी कर्तृत्व नसून विकास, सुलभता आणि सन्मान यांचा मिलाप आहे. सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन घेतलेले निर्णय आणि पारदर्शक कार्यपद्धती हीच त्यांच्या कामाची ओळख आहे.

धाराशिव जिल्ह्यातील वाशी, भुम आणि कळंब तालुक्यांमध्ये हरित ऊर्जा निर्मितीचे अत्यंत महत्त्वाचे काम करत, सेरेंटिका रिन्यूएबल्स ने ५ बिलियन युनिट्स हरित ऊर्जा निर्मितीचे ध्येय डोळ्यापुढे ठेवले आहे. प्रकल्पाच्या नियोजनापासून ते अंतिम कार्यान्वयनापर्यंत, समुदायाचे कल्याण, पर्यावरण संरक्षण आणि संवाद यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारून राष्ट्राला ऊर्जा देण्यासोबतच भावी पिढ्यांसाठी शाश्वत मूल्य निर्माण करण्याचा कंपनीचा निर्धार आहे.

प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यात काही आव्हाने समोर आली — काही ठिकाणी साहित्य चोरीच्या घटना, खंडणीच्या मागण्या, आणि प्रकल्पासंदर्भात निर्माण झालेल्या गैरसमजांमुळे आंदोलनांची परिस्थिती. अशा प्रसंगांनी प्रकल्पाच्या गतीवर परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र, कंपनीने या परिस्थितीकडे संघर्ष म्हणून नाही, तर संवादाची संधी म्हणून पाहिलं.

सेरेंटिका रिन्यूएबल्स ने या प्रत्येक आव्हानाला अत्यंत संयमाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने हाताळलं. स्थानिक प्रशासनाशी समन्वय वाढवून कायदेशीर आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात आलं. ग्रामस्थ आणि स्थानिक नेतृत्वाशी प्रत्यक्ष संवाद साधून गैरसमज दूर करण्यात आले. आंदोलनांच्या प्रसंगीही संघर्ष टाळत, सर्व पक्षांना एकत्र बसवून तोडगा काढण्यावर भर देण्यात आला.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कंपनीने “विश्वास” जिंकण्यावर लक्ष केंद्रित केलं. गावागावात जाऊन लोकांशी थेट संवाद, त्यांच्या अपेक्षा समजून घेणं आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न — या दृष्टिकोनामुळे परिस्थिती हळूहळू सकारात्मक बनत गेली.

याच विश्वासाच्या बळावर विकासाची गती वाढली. युवकांसाठी कौशल्य विकास केंद्रांमुळे स्थानिक रोजगार निर्माण झाला. महिलांसाठी स्वावलंबन प्रशिक्षण आणि शिलाई मशीन वाटपामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला. RO प्लांटद्वारे स्वच्छ पिण्याचं पाणी, शाळांमध्ये शैक्षणिक सुविधा, तसेच आरोग्य उपक्रमांमुळे समाजाच्या प्रत्येक घटकाला स्पर्श करणारा विकास साधला गेला.

तुळजाभवानी आणि येडाई आईच्या भाविकांसाठी सेवा, तसेच शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली टोल-फ्री हेल्पलाईन — या उपक्रमांमधून कंपनीने “आपलेपण” जपलं. CSR हा फक्त उपक्रम नसून नातं जोडण्याचा मार्ग आहे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं.

Follow us on social media:

सेरेंटिका रिन्यूएबल्स चा ठाम विश्वास आहे की, खऱ्या प्रगतीचा अर्थ केवळ पायाभूत सुविधा उभारणे नसून जीवनमान उंचावणे, समुदाय मजबूत करणे आणि अधिक समृद्ध, समावेशक व शाश्वत भारताच्या निर्मितीत योगदान देणे हा आहे.

या संपूर्ण प्रवासात स्थानिक लोकांचा सहभाग हा सर्वात मोठा बळ ठरला. प्रशासन, ग्रामस्थ आणि कंपनी यांच्यातील समन्वयामुळे अडचणींवर मात करत प्रकल्प पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने मदत झाली.

आज धाराशिवच्या माळरानावर उभ्या असलेल्या पवनचक्क्या केवळ वाऱ्यावर फिरत नाहीत — त्या फिरत आहेत विकास, विश्वास, सहकार्य आणि जिद्दीच्या बळावर. प्रत्येक फिरणारं पात म्हणजे प्रगतीच्या दिशेने टाकलेलं एक ठाम पाऊल आहे.

“आव्हाने प्रत्येक प्रकल्पात असतात, पण धाराशिवमध्ये आम्हाला लोकांचा जो पाठिंबा मिळाला, त्याने प्रत्येक अडथळा पार करणे शक्य झाले. हा प्रवास आमच्यासाठी खूप खास आहे.” असे कंपनीचे असिस्टंट वाईस प्रेसिडेंट सुरजीत नारायण ह्यांनी सांगितले.

ही कथा केवळ एका कंपनीच्या यशाची नाही, तर सकारात्मक दृष्टिकोन, संवाद आणि सामूहिक प्रयत्नांची आहे. धाराशिव आज हरित ऊर्जेच्या माध्यमातून विकासाच्या नव्या उंचीवर झेप घेत आहे. अशी हि हरित क्रांती धाराशिवला जगाच्या पाठीवर एक अनोखी ओळख निर्माण करून देईल आणि ह्याचा सार्थ अभिमान प्रत्येक धाराशिवकरला असेल.

या संपूर्ण प्रवासाची खरी ओळख एकाच वाक्यात —

अन विकासाचं पात फिरलं!

संबंधित बातम्या

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा सामाजिक उपक्रम: येडेश्वरी यात्रेत भाविकांना पाणी, बिस्किटे व ओआरएसचे वाटप
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्सचा सामाजिक उपक्रम: येडेश्वरी यात्रेत भाविकांना पाणी, बिस्किटे व ओआरएसचे वाटप

April 5, 2026
सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
क्रीडा

सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान

March 30, 2026
आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • अन विकासाचं पात फिरलं…
  • सेरेंटिका रिन्यूएबल्सचा सामाजिक उपक्रम: येडेश्वरी यात्रेत भाविकांना पाणी, बिस्किटे व ओआरएसचे वाटप
  • सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!