• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Monday, March 30, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान

MH25News by MH25News
March 30, 2026
in क्रीडा, ग्रामीण, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर – सोलापूरात रविवारी झालेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या चित्तथरारक अंतिम लढतीत कोल्हापूरच्या अमृता पुजारीने वेदिका सासनेला अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवत महाराष्ट्राची ४ थी महिला महाराष्ट्र केसरी बनली.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि निर्झरा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर रविवारी सायंकाळी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत अमृता पुजारी विरुद्ध वेदिका सासणे यांच्यात झाली. सुरुवातीपासून अमृता हिने आक्रमक चाल खेळत वेदिकाला कब्जात ठेवले. पहिल्या दीड मिनिटात दोन गुण मिळवत आघाडी घेतली. त्यानंतर पुन्हा तीन गुण मिळवून पहिल्या सत्रात पाच शून्य अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात वेदिकाने आक्रमक चाल खेळली परंतु अमृताने संयम दाखवत पुन्हा दोन गुण घेतले आणि विजय पक्का केला. शेवटचे दोन मिनिटे अमृताने डिफेन्स करत वेदिकाला थोपवून ठेवले. ७-० अशा फरकाने अमृताने वेदिकाचा पराभव करत महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते विजेत्या अमृता पुजारी हिला चांदीची गदा , रोख ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व सोनेट कारची चावी प्रदान करण्यात आली. तर उपविजेत्या वेदिका सासनेला २५ हजार रुपये रोख ,स्मृतिचिन्ह आणि बुलेट बक्षीस देण्यात आली. दरम्यान अमृता पुजारी हिने वेदिका सासने हिच्यावर मात केल्यानंतर समर्थक महिला कुस्तीपटू यांनी अमृता पुजारी आणि प्रशिक्षक दादासो लवटे यांना खांद्यावर घेऊन कुस्तीच्या मैदानामधून हलगीच्या कडकडाटात मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला. यावेळी फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली.

यावेळी सेरेंटिका रिन्युएबल्स चे श्री सुरजीत नारायण , महापौर विनायक कोंड्याल,हिंद केसरी योगेश दोडके,आयोजक स्वाती अळळीमोरे-साखरे, अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मेनजयराजे भोसले, ट्रिपल महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फड, महाराष्ट्र केसरी मुन्नालाल शेख, समाधान घोडके, उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले, मौला शेख, उमेश सूळ, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, सभागृहनेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जि.प. उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, रमेश बारसकर, सागर कल्याणशेट्टी, पैलवान लोखंडे, उद्योजक सागर कत्ते, प्रकाश वानकर, सुधा अळळीमोरे, योगेश बोंबाळे, श्रीदेवी फुलारे, युवराज सरवदे, यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.

महिलाकुस्ती स्पर्धेसाठी 50 लाख रुपये देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देणार – पालकमंत्री गोरे

पुरुष कुस्ती स्पर्धेसाठी राज्य शासन एक कोटी रुपयांचा निधी देते. परंतु महिला कुस्तीसाठी कोणतीही तरतूद नाही. पुढील वर्षीपासून महिला कुस्ती स्पर्धेसाठी राज्य शासनाने 50 लाख रुपये द्यावेत, असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाषणात सांगितले.

या संपूर्ण कुस्ती स्पर्धेचे युवराज केचे यांनी रांगड्या भाषेत सूत्रसंचालन केले. मुख्य कुस्त्यांमध्ये महिला कुस्तीपटू टाकल्यानंतर त्याचे बहारदार शब्दात सूत्रसंचालन केचे करीत होते.त्यांच्या जोडीला कुस्ती संपल्यावर चिअर गर्ल प्रमाणे ढोलीबाजाची साथ होती.

महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ऐन उन्हाळ्यात होती. त्यात सोलापूरचे तापमान 40 अंशापर्यंत होते. परंतु आयोजकांनी फॅन आणि कुलरची व्यवस्था करून तेथील तापमान मेंटेन ठेवले. ही स्पर्धा जास्तीत जास्त लोकांना पाहता यावी यासाठी दोन मोठ्या एलईडी स्क्रीनची सोय करण्यात आली होती. ह्या स्पर्धेत महिला प्रेक्षक उपस्थिती उल्लेखनीय होती.

Follow us on social media:

या भव्य स्पर्धेचे सह प्रायोजक हरितऊर्जा निर्मिती मधील अग्रेसर कंपनी सेरेंटिका रिन्यूएबल्स असून ह्याचे आयोजन निरझरा केअर फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती अळ्ळीमोरे साखरे यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. सेरेंटिका सर्वांगीण सामुदायिक कल्याणासाठी कटिबद्ध असून, तिचा मुख्य भर सामाजिक उन्नतीवर आहे. कुस्ती हा अत्यंत जिद्द, शिस्त आणि मेहनतीचा खेळ असला तरी महिला कुस्तीला अपेक्षित मुख्य प्रवाहातील लक्ष आणि संसाधने अनेकदा मिळत नाहीत. ही दरी ओळखून सेरेंटिकाने या स्पर्धेचे अभिमानाने प्रायोजकत्व स्वीकारले आहे. या माध्यमातून या प्रतिभावान महिला खेळाडूंना आवश्यक पाठबळ आणि योग्य व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांना मोठ्या स्तरावर आपली कामगिरी दाखवण्याची संधी मिळावी, हा यामागील उद्देश आहे.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!