धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात सध्या बिबट्याचा वावर होताना दिसून येत आहे. तुळजापूर, परंडा, परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून अनेक जनावरे व काही शेतकऱ्यांवर हल्ला केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
अशातच आता येडशी येथे रामलिंग परिसरात गाईवर वाघाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. संघरत्न लिंबराज ताकपिरे यांच्या बांधलेल्या गाईवर वाघाने हल्ला केल्याचे शेतकऱ्याने सांगितले.
पट्टेदार मादी प्रजातीचा वाघ होता असे शेतकऱ्याने सांगितले. गाईने हंबरडा फोडल्याने शेतकरी हातामध्ये असलेल्या कुऱ्हाडीने धाऊन गेल्याने वाघाने गाईला सोडून पळ काढल्याचे शेतकऱ्याने सांगितले. जखमी गाईवर सध्या उपचार सुरू आहेत. धाराशिव-कळंब चे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत भूम, परंडा, वाशी, तुळजापूर परिसरात वावरणाऱ्या बिबट्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणी संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
अधिक अपडेटससाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा
मात्र वन विभाग अद्याप देखील बिबट्यांना पकडण्यात अपयशी ठरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून लवकरात लवकर या हिस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांतून होत आहे.